Mantri
आजची टिका....!!
*राम'राज्य'मंत्री*
'शरद' मी पाहिला
पाहीली मी 'सोनिया'
खासदार झालो नमोमुळे
पाहिल केंद्र मंत्रिपदाची दुनिया
हाती पक्षाची गोफन होती
माझी इच्छा ओपन होती
मी एक शीघ्रकवी आहे
मला फक्त खुर्ची हवी आहे
उत्साही धडधडत्या छातीने
शब्दा शब्दाने घसरलो
शपथ घेताना मात्र
स्वतःलाच मी विसरलो...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment