खड्डायण

आजची टीका.....!!

*खड्डायण*

खड्डयाचा प्रश्न साऱ्यानी
कसा पहा ताणलाय
खड्डा केवळ खड्डा नाही
तो राजकीय अड्डा बनलाय

सर्वांना जरी त्याचा
रोज त्रास असतो
पूजा तेरावा वृक्षारोपणासाठी
राजकारण्यांना तो खास असतो

खड्डयावरून विरोधी महाभारत
जोडीदाराचे रामायण आहे
निवडणुका दिसु लागल्याने
प्रसिद्धिचे हे खड्डायण आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी