सोशल इंजीनियरिंग

आजची टीका.....!!

    *सोशल इंजीनियरिंग*

मतांच्या खेचाखेचीत कोण
गवर्नन्सची डेअरिंग करतो
निवडणुका डोळयासमोर ठेऊन
जोतो सोशल इंजीनियरिंग करतो

जतीचा, प्रांताचा मेळ
व्यवस्थित जुळवावा लागतो
हाच मोठपणा नंतर
मतदारांपर्यंत कळवावा लागतो

निवडणुका समोर दिसताच
शुद्ध हरपून जाते
मँक्सिमम-मिनिममचे वारे
हवेतच करपुन जाते.....!!

     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
           मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी