गरज कशाची ?
वात्रटिका
गरज कशाची ?
आजाराच्या उपचारासाठी
विदेशात गेले जेटली
चांगल्या दवाखान्याची गरज
मनातून आता पटली
आम्हाला गरज कशाची
आणि कशासाठी भांडतोय ?
देशाचे सारे रक्त
नको तिथेच सांडतोय
रामदेवांच्या आयुर्वेदात
इलाजाएवढा राम नाही
वास्तविक आशा जगात
भावनिकतेचे काम नाही
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment