कष्टाचे फळ

वात्रटिका

कष्टाचे फळ

दगड गोटे सोसून
बनलीस तू फुले
कोंडलेल्या पिंजऱ्याचे
दरवाजे केलेस खुले

तुझ्या लेकींनी व्यापले
धरणी आणि आकाश
वात होऊन जळलीस
म्हणून दिसतो प्रकाश

झिडकारलेल्या अंधश्रद्धा
त्यांचा आज विळखा
शिकलेल्या लेकी सुनांचा
तिथेच जास्त घोळका....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी