राष्ट्रभक्ती
वात्रटिका
राष्ट्रभक्ती
राष्ट्रभक्ती मोसमी नको
वर्षभर बहरली पाहिजे
राष्ट्रभक्ती तना मनात
आत बाहेर मोहरली पाहिजे
आपल्या हातातील सत्तेचे
आपल्याला भान हवे
लोकशाहीला पोषक असे
बहरणारे रान हवे
देश हा माझा आहे
हि पक्की धारणा हवी
भौतिक सुधारणे सोबत
मनाचीही सुधारणा हवी
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment