मेंदुवरील घाण

वात्रटिका

मेंदूवरची घाण

आमची बुद्धी नाठी
शिकून आम्ही ताठ झालो
कर्मठपणा कमी व्हावा
त्याचाच परिपाठ झालो

देवीच्या मंदिरात देवीला बंदी
हे खरंच पटत नाही
आमच्या मेंदुवरील घाण
काही केल्या हटत नाही

विश्वाच्या निर्मितीसाठी
पवित्र ती मादी लागते
तुला दर्शनाची गरज नाही
का फालतूंच्या नादी लागते ?

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी