हॅकिंग पे टॉकिंग
वात्रटिका
हॅकिंग पे टॉकिंग
ईव्हीएम बाबतीत
जळजळ एके जळजळ
निवडणूकीच्या तोंडावर
खळबळ एके खळबळ
आमच्या काही तज्ञांचे
डोकेच हॅकिंग असते
कोल्ह्याची कुईकुई
हॅकिंगवर टॉकिंग असते
इतके दिवस झोपले
आता झळकटपणा आहे
झोपेचे सोंग घेणाऱ्यांचा
हा कळकटपणा आहे
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment