गोड हिवाळा

वात्रटिका

गोड हिवाळा

जशी जशी वाढू लागली
बोचऱ्या थंडीची लाट
धुसफूसणाऱ्या जोडप्यांची
जुळून आली गाठ

पितात सारे गोड हिवाळा
अर्थ आज कळला आहे
नेमक्या त्या गोडव्याकडे
जो तो कसा वळला आहे

ऋतू असावा तर असा
ज्याचा ढंगच नवा असतो
जवळ जवळ जाण्यासाठी
प्रत्येकाला हवा असतो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी