वाटाघाटीची ओढ
वात्रटिका
वाटाघाटीची ओढ
राज्य चालवत चालवत
पाच वर्षे केली कुथाकुथी
आता म्हणे गोड बोलू
सत्तेसाठी करू युती
एकमेकांना दमात घ्यायची
भाषा अचानक गोड आहे
स्वाभिमान खिशात ठेवून
वाटाघाटीची ओढ आहे
आघाडी झाली म्हणजे
युती हि नक्की असते
सोडायची कितीही म्हणूद्या
अवळलेली गाठ पक्की असते
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment