घराण्याचे तराणे

वात्रटिका

घराण्याचे तराणे

देशातील राजकारणाचे
तेच ते तराणे आहेत
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
घराणेच घराणे आहेत

घराणेशाहीच्या मजबुतीला
मतदारांचे बळ आहे
म्हणूनच लेक,सून,पोरगा
पदाच्या जवळ आहे

सत्तेचे सारे फॉर्म्युले
घराण्याच्या हाती असतात
कार्यकर्ते आणि भक्त
पेटवायच्या वाती असतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी