मी नाही त्यातला
वात्रटिका
मी नाही त्यातला
तो गेला हुरळून
सुरू झाले म्हणे डान्सबार
बायकोला कुणकुण लागता
यथेच्छ मिळाला मार
आता डान्सबारने म्हणे
सारा धुमाकूळ घातला
मित्राचा फोन येताच
म्हणे मी नाही त्यातला
गरमागरम वातावरणात
बरा नाही डान्सबार
तुला शक्य असेल मित्रा
तुझा तू चान्स मार...!
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment