षटकार

वात्रटिका

षटकार

आरक्षणाच्या मार्गात
आर्थिक तोरण आहे
निवडणुकीच्या आखाड्यात
नवे खासे धोरण आहे

विरोधकांना देण्यासाठी
हि मोठी टक्कर झाली
आरक्षणाच्या षटकाराने
विरोधकांना चक्कर आली

मतासाठी केलेल्या बाबी
कधी टिकू शकत नाहित
याला इतिहास साक्षी आहे
आम्ही मनचे बकत नाहित

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी