दे धक्का

वात्रटिका

दे धक्का

निवडणूक यावी म्हणून
पक्षांची हुळहूळ असते
जोडीदार जमवण्यासाठी
राजकीय तिळगुळ असते

आश्वासनाच्या नावाने
कधी फेकाफेकी असते
जे जे शत्रू वाटायचे
त्यांचीच एकी असते

कोणाला कुंकू लावताना
कोणाला बुक्का असतो
आपलं आपलं म्हणत
कोणाला दे धक्का असतो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'