साहित्याचा पाव

वात्रटिका

साहित्याचा पाव

वाद नाही संमेलन नाही
असा पुन्हा कित्ता असतो
अचानक कट झालेला
उद्घाटकांचा पत्ता असतो

अखिल आहे भारतीय आहे
क्वालिटी तेवढी लोकल
शेवटपर्यंत नेम नाही
कोण कोणावर भोकल

राजकारणाची मिसळ
साहित्याचा पाव होतो
कोण हवे कोण नको
त्याचा कावकाव होतो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी