वावडे

वात्रटिका

वावडे

मार्ग कोणताही असुद्या
जिंकणे एवढेच सत्य
विजय मिळावणे हेच
लोकशाहीतील तथ्य

पैसा आणि घराणा हवा
तेंव्हा भाकर भाजत असते
राजकीय चुलीवर
आपली डाळ शिजत असते

पैशावाल्यांच्या हातात
पदाचे फावडे असते
इमानदार लोकांचे
लोकशाहीस वावडे असते

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी