वैचारिक घाण

वात्रटिका

वैचारिक घाण

जो कोणी करतो
वैचारिक घाण
त्यालाही मिळतोय
समाजात मान

चांगलं न शिकवता
केलं म्हणे गुर्जी
तरुण टाळक्यांची
पार झाली भुर्जी

भडक तडक बोलून
नेहमीच खोकतात
पोरं होण्यासाठी
कधी आंबेही विकतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी