पुरस्कार
वात्रटिका
पुरस्कार
ज्यांनी खरी क्रांती केली
त्यांचे कुठे नाव नाही
भारता तुझे रत्न व्हायला
त्यांना कुठे वाव नाही
पुरस्कार देण्यासाठी
अनेक खरे नायक होते
ज्यांना कुणाला मिळाला
त्यांच्याहूनही लायक होते
साऱ्या पुरस्कारांना
स्वतःभोवती तोलू नये
कितीही पटले नाही
तरीही कोणी बोलू नये ?
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment