तुकोबांचे वचन

वात्रटिका

तुकोबांचे वचन

पुरस्कार जाहिर होताच
त्यांची बुद्धी झाली जागी
भारतरत्न पुरस्कारात
दाखवा म्हणे योगी ?

योग्यनं अपेक्षा करणं
योगीपणाचा भंग आहे
जो अशी मागणी करतो
तो म्हणजे ढोंग आहे

मुखे सांगे ब्रम्हज्ञान
मनी धन आणि मान
तुकोबांचे वचन आहे
तरीही आमच्या लोकांना
कुठे त्याचे पचन आहे ?

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी