बाबाला पेन्शन
वात्रटिका
बाबाला पेन्शन
कामधंदे बघायचे सोडून
तरुण बाबा होऊ लागले
कारण काय तर म्हणे
सरकार पेन्शन देऊ लागले
हि गोष्ट योगायोगी नाही
मुख्यमंत्रीच बाबा आहे
कुठलेही निर्णय घेताना
भावनेवर कुठे ताबा आहे ?
भविष्यामध्ये कोण जाणे
देशाचाच भात होईल
देशाचा प्रधानमंत्री जर
असा कोणी नाथ होईल
- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment