राजकीय संसार

वात्रटिका

राजकीय संसार

सत्ता हस्तगत करणे
हाच राजकारणाचा एम
कोणीही कोणासोबत जाते
दुसऱ्याचा करतो गेम

विचार आणि वाद
फक्त म्हणायचे असतात
प्रत्यक्षात सत्तेचे स्वाद
मिळून हाणायचे असतात

राजकीय संसाराला
फायदा पाहून नांदावे लागते
जनता भोळी असल्याने
मलिद्यासाठी रांधावे लागते

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी