राजकीय सत्य

वात्रटिका

राजकीय सत्य

निवडणुका जवळ येताच
अनेकांच्या मोटी असतात
ज्यांचा कायम विरोध
त्यांच्या गाठीभेटी असतात

कोणी कोणाचा नसतो
हे राजकीय सत्य असते
सत्तेच्या राजकारणात
असे होणे नित्य असते

कोण कोणत्या विचाराचे
ओळखणे अवघड आहे
नेत्यांची हि बांधाबांधी
सत्तेसाठीची बडबड आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी