Paryavaran

🌏श्रीकृष्ण उबाळे🌏 यांची एक कविता............

🌺पर्यावरण जपु🌺

तापमान किती वाढले हो
तापमान किती वाढले
झाडं किती तोडले हो
झाडं किती तोडले || 1||

पाणी किती खोल हो
पाणी किती खोल
जमिनीला जगोजगी
पाडले किती होल ||2||

हवा नाही ठीक हो
हवा नाही ठीक
वाहनांचे तुमच्या
तनासारखे पिक ||3||

घाण पाणी वाढले हो
घाण पाणी वाढले
नद्यांमध्ये सांगा
गटार कोणी सोडले ?||4||

आवाजाने त्रासले हो
आवाजाने त्रासले
शांती हवी तिथच
भोंगे तुमचे वासले ||5||

थोडा मार्ग सांगावा हो
थोडा मार्ग सांगावा
झाडे झुडपे वाढवा हो
थेंब थेंब आडवा ||6||

वाहनांचा वापर कमी
गटाराची हमी
आवाज करा बंद
प्लास्टिक वापर पुन्हा पुन्हा
लावा हा छंद ||7||

करा असे तडाफडा
नाहीतर तसेच तरफडा ||8||
 
     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
          मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास नक्की शेयर करा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'