कांदा
आजची टिका.....!!
🌺 कांदा 🌺
कुणाला कांदा हसवतो
कुणाला कांदा रडवतो
व्यावसायिक दृष्टिने
कांदा नेहमीच नडवतो
शेतकऱ्याकडे असताना
कवडीमोल असतो कांदा
व्यापाऱ्याकडं गेल्यावर
नफ्याचाच होतो धंदा
इथून तिथून सारी
व्यवस्थेलाच लागलिय कीड
बळीचे रक्त ढोसुन
बंबाटलेत सारे गोचिड.....!!
✍🏻 श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment