दुष्काळी डोळे

पाण्याअभावी मोसंबी, डाळीम्ब ,इतर फळबाग नष्ट झालेल्या शेतकऱ्याचे मनोगत
सांगणारी 🌏श्रीकृष्ण उबाळे🌏 यांची एक कविता........!!

😦 दुष्काळी डोळे 😦

पाणी नाही म्हणून
जळून गेला बाग
शेळीच पार बनलो
झालो होतो वाघ..||1||

लेकरावाणी जपलं तुला
पाण्यानं घातलं न्हाऊ
उपाशी पोटी झोपलो
तुला खतांनी घातलं खाऊ.||2||

तुझाच ध्यास मला
तुझ्याच साठी झटायचो
तुझ्यात रुपात रोज
विठ्ठल रखुमाईला भेटायचो ||3||

माझं भविष्य होतास
मनात मी नाचलो
आज तुझी अवस्था पाहुन
पारच मी खचलो ||4||

तुझ्या चिपाडलेल्या देहावर
नजर जेंव्हा टाकतो
तरुण मुलगा मारतो ना
त्या बापासारखा वाकतो ||5||

तुझे मरगळलेले बुंधे तोडताना
अवस्था काय सांगू आता
मेलेल्या लेकराची जनु
बापच पेटवतोय चिता ||6||

सारं सारं पाणी बघ
काळजात आलं दाटुन
डोळेही माझे दुष्काळी
तीथलं पाणीही गेलं आटुन ||7||

✍🏻श्रीकृष्ण उबाळे ,बीड
    मो.9405344642
aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास जसी आहे तसी नक्की शेयर करा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'