अभ्यास

जालन्याच्या अन्सार शेख याचे यश सांगणारी 🌏श्रीकृष्ण उबाळे 🌏 यांची कविता......

    🌺 अभ्यास 🌺

खऱ्या अभ्यासाचा चमत्कार
पहायचाय का तुला ?
गरीबाच्या पोरा कलेक्टर
व्हायचय का तुला ? ||1||

असाध्य ते साध्य
करून अभ्यास
केले रिक्षावाल्याच्या पोराने
चिंता सोड कामाला लाग
असेल तेवढया जोराने ||2||

शिक खुप खुप शिक
अभ्यासाचा संघर्ष कर
बाप गरिबीत मरतोय
त्याच्या मनाला हर्ष कर ||3||

कलामांना सलाम कर
स्वप्न पहा मोठे
अभ्यास एके अभ्यास
बाकी सारे खोटे ||4||

गरीब असतो तोच
जो धरीत नाही ध्यास
अमीर असतो तोच
जो करीत असतो अभ्यास ||5||

अभ्यास म्हणजे श्रीमंती
अभ्यास असतो सर्व
अभ्यास घडवतो माणसाला
अभ्यास असतो जीवनपर्व ||6||

इवल्या बियात असतं झाड
सुप्तपणे पेरलेलं
दगडातच असतं वेरुळ
नक्षीकाम कोरलेलं ||7||

  ✍🏻श्रीकृष्ण उबाळे ,बीड
       मो.9405344642
    aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास जसी आहे तसी नक्की शेअर करा.....!!🙏🙏🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'