Jaat
आजची टिका.......!!
🌺 जात 🌺
कुणी सोशल समर्थक
कुणी स्पेशल विरोधक
आमक्या जातीची पोरगी
पळवून नेली
काम केलं सुप्पर
दोघांनाही कसा चिरला
हाय का आता टप्पर
काल्पनिक गोष्टीसाठीही
जात म्हणजे फाईट आहे
काही बुद्धिमान राँग म्हणतात
जात काहींसाठी राईट आहे
जात शिकलेल्या नसानसात
आजही तशीच जीवंत आहे
पुरोगामीत्वाच्या कितीही गप्पा मारल्या
जात कोणाची जात नाही ही खंत आहे...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot. in
Comments
Post a Comment