पावसा तु पड रे

पावसाला आवाहन करणारी
🌏श्रीकृष्ण उबाळे 🌏 यांची एक कविता.....!!

🌧 पावसा तु पड रे! 🌧
----------------------------------------

पाणवठे सारे आटले
विहिरी बनल्या केवळ बंकर
गावोगावी युद्ध पाण्याचे
रणगाडे हे बनले टँकर
तुझविन जीवन अवघड रे
पावसा तु पड रे.....//1//

झाडं वेली जळून गेले
पाने फुले गळुन गेले
शेतकरी सारे हळूहळून गेले
बरेच शहरात पळून गेले
आभाळात होऊ दे गडगड रे
पावसा तु पड रे.....//2//

दिलास सर्वांना चांगलाच धडा
मिळेना झालाय पाण्याचा घडा
झाडे लावु झाडे जगवु
समतोल सगळा नीट टिकवु
ही नाही नुसती बडबड रे
पवसा तु पड रे......//3//

तु आमची माय रे
तु अमचा आहेस बाप
कळाला तु नसण्याचा ताप
संपव तु सारी दुष्काळी नड रे
पावसा तु पड रे......//4//

जीवनाचे कारण तु
जगण्याचे धोरण तु
वसुंधरेचे तोरण तु
बरसु दे तुझी झड रे
पावसा तु पड रे...//5//

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
        मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास आहे तसी नक्की शेयर करा...🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'