रक्ताचा रंग

आजच्या विषयाशी संबंधीत 🌏श्रीकृष्ण उबाळे 🌏 यांची एक कविता.....!!

     🌷 रक्ताचा रंग 🌷
----------------------------------------

ख्रिचनांच पांढरं
मुसलमानांच हिरवं
बौद्धांच निळ
हिंदूच भगवं अन्
सिखांच पिवळ
खरच असत का रक्त
एकदा पहायचय मला
एक दिवस ख्रिचन
एक दिवस मुसलमान
एक दिवस बौद्ध
एक दिवस हिंदु
एक दिवस सिख व्हायचय मला....!!

त्यावेळी माझे शरीर
वैज्ञानिक चमत्कार होईल
माझ्या रक्ताचे वेगवेगळे रंग
जग डोळे फुत्कारुन पहिल.....!!

ख्रिचन झाल्यावर चर्चमध्ये
मुसलमान झाल्यावर मशिदित
बौद्ध झाल्यावर विहारात
हिंदु झाल्यावर मंदिरात
सिख झाल्यावर गुरुद्वा-यात जाईल
धर्माशिवाय मी मानव आहे
या दृष्टीने कोण माझ्याकडे पाहिल ?

मी मेल्यावर मात्र
होईल मोठी भानगड
मला पुरायच, जाळायच
की दफनायच
यावरून सरेच करतील गडबड
त्यातून दंगाही होईल
मोठा सामाजिक पंगाही होईल
त्यावेळी मात्र
माझे  हृदय फाडा
माझे रक्त बाहेर काढा
रक्ताचा रंग बघा
नेमका आहे कसा
आणि मगच भांडत बसा......!!
   
    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642
    aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास आहे तसी नक्की शेयर करा....!!🙏🙏

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी