वळवळे आणि कळलावे

वात्रटिका

वळवळे आणि कळलावे

दुसऱ्याचा फायदा बघून
काहींच्या डोक्यात वळवळ
देणं-घेणं काही नसतं
तरी पोटात उठलेली कळ

वळवळे आणि कळलावे
यांचा एकच धंदा असतो
चांगल्याचा नाश करणे 
विचार हा गंदा असतो

वळवळ्यांना कळवळ्यांना
थोडातरी आवरलं पाहिजे
दुसऱ्याच्या फायद्यासाठी
स्वतःला सावरलं पाहिजे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'