हिट फॉर्म्युला

वात्रटिका

हिट फॉर्म्युला

शेतकऱ्यांची कर्जमाफी
हिट असा फॉर्म्युला आहे
नेत्यांच्या तोंडी आता
कर्जमाफीचा झुला आहे

सत्तेपेक्षा विरोधकच
जास्त कनवाळू वाटतात
शेतऱ्यांप्रती त्यांचे गळे
नेहमी नेहमी दाटतात

कर्जमाफी देण्यापेक्षा
त्यांच्यावर अशी वेळ नको
नुसते भावनिक करण्याचा
पारंपरिक खेळ नको...!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२


Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'