सत्तेचं तत्व

वात्रटिका

सत्तेचे तत्व

जेंव्हा जेंव्हा सत्तेला
बसू लागतात झळा
तेंव्हा तेंव्हा लोकांवर
ठेवला जातो डोळा

इंग्रजांपासून आजपर्यंत
हाच तर अनुभव आहे
सत्तेच्या घशाला विरोधाची
नेहमीच खवखव आहे

आपली खुर्ची पक्की करणे
यालाच सारे महत्त्व असते
काळ कोणताही असुद्या
सत्तेचे हेच तत्व असते...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी