हनुमानाचे दलीतत्व
वात्रटिका
हनुमानाचे दलितत्व
स्वतःला योगी समजणारे
वाटेल ते बरळू लागले
हनुमान दलित असल्याचे
जाहीर तरळू लागले
ज्यांना देव मानतात
त्यांच्यातही आता जात आहे
यांची बुद्धी खरंतर
भेदाची माती खात आहे
लोकांची कामे करायची तर
देवा धर्माची खाज आहे
आपण काय बोलतोय
याची कुणाला लाज आहे ?
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment