बाजार

वात्रटिका

बाजार

निवडणुकीच्या बाजारात
पैशावाल्यात दम असतो
विचार कृतीने नालायक
विजयी छिंदम असतो

नावं कोणाला ठेवायची
कारणीभूत मतदार आहे
पैसा आणि आपली जात
लोकशाहीचा आधार आहे

येथे पाहिजे स्वजातीचे
बाकीमध्ये राम नाही
महापुरुष नावापुरते
प्रत्यक्ष त्यांचे काम नाही

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी