धमक्या

वात्रटिका

धमक्या

लोकशाही देशात
हुकूमशाही खमक्या
चित्रपट लावण्यावरून
दिल्या जातात धमक्या

उपद्रवमूल्य किती आहे
यात सारी पावर असते
वाट्टेल तसे वागायला
स्वतःचे जणू वावर असते

भविष्यात कोणी कोणी
तिकिटाची जबरदस्ती करीन
तिकीट नाही घेतल्यावर
लोकांची मानगुटी धरीन

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'