प्रतिबंधक लस

वात्रटिका

प्रतिबंधक लस

तोंडात तरी पाज
नाहीतर दंडात खोस
सारकरभाऊ भ्रष्टाचारावर
येऊद्या एखादा डोस

पैसा खायला मोठेपणी
वाटत नाहित लाजा
प्रतिबंधक लस करून
सर्वांना लहानपणीच पाजा

भ्रष्टाचाराने साऱ्या देशाला
झाला पोलिओ रुबेला
डोस पाजून बघा भाऊ
रोग गेला तर गेला.....!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'