कोल्हेकुई

वात्रटिका

कोल्हेकुई

निवडणुकीच्या मंथनातून
परिवर्तनाचं निघालं तूप
ईव्हीएम विरोधी कोल्हेकुई
एकाएकी झाली चूप

पुन्हा तेच आले असते
विरोधी घसा कोरडा असता
विचार करून बघा
किती आरडाओरडा असता

मशीन घोळ करत नाही
सत्याचा या स्विकार करा
इथुनपुढे तरी कोल्हेकुईचा
सारे मिळून धिक्कार करा

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी