मोठेपणाचा भाव

वात्रटिका

मोठेपणाचा भाव

काही मळकुंडे असतात
काही जळकुंडे असतात
काही मिळत नसते तरी
काही हळकुंडे असतात

मळकुंड्यांचा मळ दिसतो
जळकुंड्यांचा धूर दिसतो
इथून तिथून पिवळाधम्मक
हाळकुंड्यांचा उर दिसतो

तिघांचेही असे वागणे
निव्वळ निव्वळ आव आहे
तिघांच्याही चेहऱ्यावर
मोठेपणाचा भाव आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'