मुरलेलं पाणी

वात्रटिका

मुरलेलं पाणी

सरकारच्या सांगण्यावरून
संडास बांधलं घरात
तरीही गावोगावी दिसते
सारी टमरेलची वरात

गावातला पाणीप्रश्न
जोपर्यंत मिटत नाही
किती संडास बांधा
टमरेल काही सुटत नाही

काहीकाही बहाद्दरांनी
चक्क संडासच चोरलय
गावात येणार पाणी
वेगवेगळ्या जागी मुरलय

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी