तुझं माझं जमेना

वात्रटिका

तुझं माझं जमेना

नेहमी नेहमी भांडून
निवडणुकीत हातात हात
लोकांनाही समजेना
कमळ-बाणाची बात

वाघाच्या डरकाळ्यांनी
कमळ आता झुकत नाही
कोणी काही आरोप करा
कुणाचेच काही दुखत नाही

किती धमक्या झाल्या
कोणी काही शरमेना
तुझं माझं जमेना अन
तुझ्यावाचून करमेना

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी