निमित्त

वात्रटिका

निमित्ताचं वारं कसं
आलं बघा अंगात
मध्यरात्री धाब्यांवरती
सारे किती रंगात

बाटल्या कोंबड्यांनी
गण्यावरती ताल
साजरं म्हणे केलं पाहिजे
सरत आलेलं साल

थर्टी फस्टची संस्कृती
अनेकांसाठी खास बनली
तरुणापासून म्हाताऱ्यापर्यंत
ग्लासामधला श्वास बनली

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी