गचाळता

वात्रटिका

गचाळता

भक्तांनाही माहित नाही
त्यांच्या ध्यानी ना मनी
कालपर्यंत दलित हनुमान
आज त्याला केले चिनी

अकलेपेक्षा जास्त मिळाल्यावर
तारे नेहमी तोडले जातात
कागदी विमानी पायलटकडून
अशी विमाने सोडले जातात

असे तेंव्हा घडते जेंव्हा
क्रियेविन वाचाळता असते
अशा महामणींच्या घोळक्यात
फक्त गचाळता असते

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'