तीर्थाटन

वात्रटिका

तीर्थाटन

सत्तेत राहून नेहमीच
सत्ताविरोधी टणाटण
विविध तीर्थक्षेत्रांवर
साहेबांचे तीर्थाटन

विरोधकांचे मुद्दे
सत्ताधारी लाटू लागले
आजकालचे जोडीदार
ढोलके वाटू लागले

शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा
मंदीराशी सख्य आहे
बोलण्यातला विषय
तोच तर मुख्य आहे...!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी