जातीवंत

वात्रटिका

जातिवंत

माणुसकी जेव्हा मरते
सारेच गप्प असतात
जाती-जातीत असल्यावर
व्यवहार ठप्प असतात

माणुसकी महत्त्वाची नाही
मुख्य ती जात असते
सारं रान पेटवणारी
जळजळीत वात असते

जातीवाद विरोधीच
पक्के जातिवंत असतात
माणुसकी मेल्यावर
म्हणून ते शांत असतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी