दैवीकरण

वात्रटिका

दैवीकरण

महापुरुषांच्या दैवीकरणाचा
नेहमीच त्यांना नाद आहे
ज्यांच्या नावे दुकानं चालू
त्यांचाच नेहमी वाद आहे

विचारी नको असतात
त्यांना नेमका भक्त पाहिजे
उदोउदोसाठी सळसळणारं
त्यांना गरम रक्त पाहिजे

यांच्याभोवती जमलेला
किती मोठा घोळका रे
यांच्या रंगावर जाऊ नका
हेतू यांचा ओळखा रे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी