गहिवर
वात्रटिका
गहिवर
धगधगता ज्वालामुखी
आज शांत झाला
एका ज्ञानप्रकाशाचा
अचानक अंत झाला
भारताचा लाडका सुपुत्र
अचानक स्तब्ध झाला
त्याच्या प्रत्येक कृतीचा
अंगारिक शब्द झाला
उत्तुंग निळे आकाश
अचानक भुईवर आले
लाखो कोटी जनांना
दुःखाने गहिवर आले
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment