विखार

वात्रटिका

विखार

बोलताना हसवले जाते
वागताना फसवले जाते
जे सन्मार्गाने चालतात
त्यांना खाली बसवले जाते

चांगुलपणा घेण्यासाठी
इथे कुणाला उसंत आहे
चांगल्यात माती कालवणे
हिच काहींची पसंत आहे

चांगले करता येत नसेल
माती तरी कालवू नका
आपले वळवळणारे विखार
उगाच असे हालवू नका

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी