पास नापास

वात्रटिका

पास नापास

हाताच्या बाहुचे बळ
चांगलेच वाढले आहे
फुलणारे कमळाचे फुल
हाताने खुडले आहे

टॉपरचा गप्पू विद्यार्थी
अगोदरच नापास झाला
पप्पू म्हणून हिनवले
तोच शेवटी पास झाला

बदल होत असतोच
तो निसर्गाचा नियम असतो
कोणताही सत्ताधारी असो
तो थोडाच कायम असतो ?

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी