वजनदार समर्थक

वात्रटिका

वजनदार समर्थक

फरार मल्ल्याभाऊ
साहेबांसाठी सज्जन
फ्रॉड म्हणणे चुकीचे
असे त्यांचे भजन

मल्ल्याभाऊ येण्यापूर्वीच
समर्थक भेटू लागले
मल्ल्याभाऊच्या प्रेमाने
रक्त त्यांचे आटू लागले

मोठमोठ्या लुटारूंचे
वजनदार समर्थक
कायद्याचे प्रयत्न
त्यामुळेच निरर्थक

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी