तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका

तुकाराम महाराज यांच्या अभंगातील वात्रटिका-३

"भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा
तेथे अनुभवाचा काय पंथ ||१||

वाढवुनी जटा फिरे दाही दिशा
तरी जंबू वेषा सहज स्थिती ||२||

करोनियां भूमी करी मध्ये वास
तरी उंदरास काय वाणी ||३||

तुका म्हणे ऐसें कासया करावें
देहासी दंडावे वाउगेची ||४||"

    कोल्हा किंवा कित्रा यांना निसर्गाने भगवा रंग दिला तरी त्याचा आणि आकलिचा काही संबंध येत नाही.
त्याला कसलाही अनुभव नसतो.  कोणी भगवे वस्त्र परिधान केले म्हणून
तो साधु ,संत ,धार्मिक होवु शकत नाही. आशा लोकांना धर्माचे कसलेही ज्ञान नसते. अस्वलाच्या जटा निसर्गत:
वाढलेल्या असतात आणि तो सगळीकडे फिरत असतो मग त्याला काय माहात्मा म्हाणणार का? कुणी जटा वाढवून, दाढीचे केस वाढवून साधु असल्याचे सांगत असेल तर तो अस्वलापेक्षा वेगळा नाही. असे जटाधारी धर्मगुरु यांना लगावलेला हा जबरदस्त टोला आहे.

     उंदीर जमिनीखाली बिळ तयार करून राहतो म्हणून तो तपस्वी होवु शकत नाही किंवा असे तप जप करणारे लोक उंदरापेक्षा निराळे अजिबात नाहीत.आशा लोकांना आपल्या शब्दाने झोडण्याचे महान काम संत तुकाराम यांनी केलेले आहे.
तुकाराम म्हणतात आशा पद्धतीने शरीराला त्रास करुण घेऊन काही उपयोग होत नाही.
     आजच्या स्थितीशी या अभंगाची तुलना केली तर.....! आज भगवे कपडे घालून,जटा ,दाढी वाढवून जप,तप,उपवास,व्रत या गोष्टी सांगणारे 'कोडगेबाबा','भोंदूबाबा' कमी नाहीत.सारा समाज या धताल्या लोकांनी भुलवला आहे. तुकाराम अशा लोकांना श्वान,अस्वल,उंदीर आशा मार्मिक उपमा देतात.
वात्रटिकेमध्ये असणारी वैशिष्ट्ये म्हणजे द्विअर्थी शब्दप्रयोग,योग्य उपमा,दंभीकता उघडी पाडणे, असत्याला असत्य म्हणण्याची हिंमत दाखवने ही वैशिष्ट्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात आढळतात म्हणून त्यांच्या अभंगात वात्रटिका ठासुन भरलेली आहे हे पटल्याशिवाय राहत नाही.

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'